अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बिबटया मृतावस्थेत आढळला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर चौकी शिवारात शुक्रवारी सकाळी नर जातीचा बिबटया मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृतावस्थेत आढळलेल्या नर जातीच्या बिबटयाचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण समजू शकले नाही.सकाळी हा प्रकार स्थानिक नागरिकाच्या लक्षात येताच घडलेल्या घटनेची माहिती वनधिकाऱ्यास देण्यात आली.

वनसंरक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विकास पवार, लांडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

स्थानिक नागरिकाच्या मदत घेत पंचनामा केला. मृतावस्थेत आढळलेल्या बिबटयाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment