वाहने लुटणारी दराेडेखाेरांची टाेळी गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- ट्रकचालकांना रात्री अडवून लूटमार करणारी दराेडेखाेरांची टाेळी ताेफखाना पाेलिसांनी गजाआड केली. केडगाव ते निंबळक बायपासवरील रेल्वेपुलाजवळ दाेन ट्रकचालकांना त्यांनी लुटले हाेते.

हे आरोपी एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अक्षय भिमा गाडे (२३, मुदगलवाडा), विश्वास नामदेव गायकवाड (२१, एमआयडीसी), नीलेश बाळासाहेब कारले २३, वडगावगुप्ता), नीलेश संजय शिंदे (२१, तांबटकरमळा),

अमाेल बाबुराव कणसे (२५, बाेल्हेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. दाेन ट्रकचालक क्लास्क व्हील कंपनीचा माल घेऊन चालले असता त्यांना लुबाडण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment