शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा कारभार ‘ह्या’ व्यक्तीकडे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाल्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त झाले आहे.

शासनाने त्वरित वरिष्ठ आयएएस अधिकारीची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करावी, तसेच नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी दिवाणी अर्जाद्वारे विनंती केली.

त्यानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश हेच साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष असतील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे तदर्थ समितीचे सचिव असतील.

समितीच्या बैठकीत विषय निवडण्याचे अधिकार अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना राहतील, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी दिले आहेत.

माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने नवीन विश्वस्त शासनामार्फत नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

अतिरिक्त विभागीय आयुक्त व सह धर्मादाय आयुक्त नगर यांची तदर्थ समिती गठीत करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार 9 ऑक्टोबर 2019 च्या आदेशान्वये दिले होते.

सदर समिती ऑक्टोबर 2019 पासून साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचा कार्यभार सांभाळत असून उच्च न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे.

उच्च न्यायालयाने प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी सादर केलेल्या अहवालानुसार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी

यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचे निरीक्षण नोंदवत तदर्थ समितीच्या रचनेत व अधिकाराचे धोरण स्पष्ट केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News