लग्न झालं अन दोनच दिवसात पोलीस नवरीला न्यायला आले, अन सगळा भांडाफोड झाला.., अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरीला घ्यायला पोलीस आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे नवरदेवाकडील लोकांच्या लक्षात आले.

Ahmednagarlive24 office
Updated:
navari

Ahmednagar News : राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरीला घ्यायला पोलीस आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे नवरदेवाकडील लोकांच्या लक्षात आले.

या घटनेतील एक ३० वर्षीय शेतकरी तरुण राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. बऱ्याच दिवसांपासून तो लग्नासाठी मुलगी शोधत होता. याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एजंटने त्याला मुलगी दाखवली.

ही मुलगी नेवासा येथील असल्याचे सांगीतले. मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवदेवाकडून अडिच लाख रुपये घेतले व राहाता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थित लग्न लावून दिले.

या घटनेतील नवरी मुलगी ही मुळची जळगाव येथील असून तिच्या आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार जळगाव येथील पोलिस पथक तरुणीचा शोध घेत राहुरी येथे आले आणि नवरदेव मुलाच्या घरातून तरुणीला ताब्यात घेतले.

दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलिस पथक आल्याने नवदेवासह त्याच्या नातेवाईक भयभीत झाले. पोलिस पथकाने नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली. त्यानंतर राहुरी पोलिस पथकाकडून तरुणीला जळगाव येथील पोलिस पथकाच्या ताब्यात दिले.

नंतर जळगाव येथील पोलिस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले. या दरम्यान आपली अडिच लाखाची फसवणूक झाल्याचे नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.

सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणे अवघड झाले आहे. याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळ्य सक्रिय झाल्या आहेत. लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असे सांगून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांची फसवणूक होत आहे.

नवरी मुलगी पाहताना त्या मुलीबाबत तसेच तीच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावे, असे पोलिस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe