‘त्या’ नर्सची कमाल; सेंट्रल बँकेच्या विरोधात गेली रिझर्व्ह बँकेकडे आणि मिळवला न्याय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  बऱ्याच लोकांना बँकेमध्ये वाईट अनुभव येतात. त्यांच्या मनमानी स्वभावामुळे अनेक ग्राहक फटकाही बसतो. परंतु त्याच्याविरुद्ध कुणी आवाज उठवण्याचे प्रयत्न करत नाही.

परंतु याला अपवाद आहेत हॉस्पिटलमध्ये नर्स असणाऱ्या शीतल दत्ता घोडके ही महिला. या महिलेने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची चिचोंडी पाटील येथील शाखा ते रिझर्व्ह बॅंकेपर्यंत चार महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर न्याय मिळवला.

त्याचे झाले असे, शीतल यांनी 2013मध्ये अडीच लाखांची मुदतठेव 10 वर्षांसाठी सेंट्रल बॅंकेच्या चिचोंडी पाटील येथील शाखेत ठेवली. त्यावर डिसेंबर-2018 मध्ये 1 लाख 15 हजार रुपयांचे कर्ज घेतले.

पावतीची मुदत संपण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असताना, बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांनी 31 मार्च रोजी पावती मोडून कर्जखात्यात जमा केली. याबाबत घोडके यांनी प्रादेशिक व्यवस्थापक, नगर यांच्याकडे तक्रार केली.

मात्र, तेथेही दाद मिळाली नाही. अखेर त्यांनी थेट रिझर्व्ह बॅंकेत धाव घेतली. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment