… त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोव्हिड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदारांचा आदेश येताच आम्ही याठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु कोव्हिड सेंटर चालू असताना वैद्यकीय अधिकार्‍यांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही.

तसेच येथे आलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आहे हे आम्हाला न सांगता कोव्हिड सेंटरमध्ये ठेवून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले.

हा जीवाशी खेळण्याचा प्रकार प्रशासनाने केला असल्याची तक्रार श्रीरामपूर येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निकलचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली आहे.

ते पुढे म्हणाले, वीज वितरणचे अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना आमच्या येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. परंतु ते पॉझिटिव्ह आहे हे वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोणालाही सांगितले नाही.

त्याठिकाणी आमच्या संस्थेचे कर्मचारीही मदत म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे कपडे, बेड, व अन्य साहित्य तसेच पडून होते ते सर्व आमच्या कर्मचार्‍यांनी आवरलेही.

त्यानंतर कळाले की, ते अधिकारी पॉझिटिव्ह होते. त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला असेही ते म्हणाले. या अधिकार्‍यांविरुध्द तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment