राज्यमंत्री म्हणाले… तर शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणला असता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-राहुरी नगरपालिकेचा साडे तीन वर्ष नगराध्यक्ष असताना राज्यात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने त्याकाळात निधी मिळत नव्हता, पण आता नगराध्यक्ष नसताना सुद्धागावचा आमदार नगरविकास मंत्री म्हणून 8 कोटींचा निधी प्राप्त केला आहे.

दरम्यान जर कोरोनाचे संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग 1मधील येवले आखाडा व दत्त नगर येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ना तनपुरे बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले की, शहरासाठी लवकरच 29कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम सुरु होणार असून

त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने कामे मार्गी लागली आहे. फक्त निवडणुकीत मते घेण्यासाठी मंजुरी आणली नाही असेही यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe