सासूने सुनेला काठीने मारहाण करून दिली ‘ती’ धमकी ; सासूवर गुन्हा दाखल

Published on -

Ahmednagar News : गाय बांधण्यासाठी ठोकलेला खिळाकाढत असताना सासुने सुनेला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे दि. २६ जुलै २०२४ रोजी घडली आहे.

आज सासू सुनेचे वाद नाहीत असे एकही घर शोधून देखील सापडणार नाही. किरकोळ कारणावरून अनेकदा सासू सुनेचे मोठ्या प्रमाणात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत देखील होतात.

अशीच घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे घडली आहे. घरासमोर गाय बांधण्यास मज्जाव करत गाय बांधण्यासाठी ठोकलेला खिळा काढण्यावरून सासू सुनेच्या वाद होऊन, सासुने सुनेला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल. त्यामुळे सासूवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या घटनेतील उर्मिला आण्णासाहेब जाधव, वय ३४ वर्षे या राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात.
त्यांच्या शेजारीच त्यांचे सासू सासरे हे वेगळे राहतात.

दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान उर्मिला जाधव या त्यांच्या घरी असताना त्यांची सासू मंगल लक्ष्मण जाधव यांनी उर्मिला यांच्या घराचे समोर गाय बांधण्यासाठी खिळा ठोकला होता. तेव्हा उर्मिला जाधव यांनी तेथे गाय बांधण्यास मज्जाव करुन ठोकलेला खिळा काढत होत्या.

त्यावेळी उर्मिला जाधव यांना त्यांच्या सासुने शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्क्‌यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर उर्मिला आण्णासाहेब जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्या फिर्यादीवरून उर्मिला जाधव यांची सासू मंगल लक्ष्मण जाधव यांच्यावर गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News