बहुचर्चित फोक्सवॅगनची तायगुन शहरात दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- उत्तम बांधणी, चाळीसहून अधिक सेफ्टी फीचर्स, फन टू ड्राइव्ह आणि एसयूव्ही श्रेणी मधील सर्वात कमी मेंटनन्स असणार्‍या बहुचर्चित फोक्सवॅगन तायगुन या एसयूव्ही कारचे अनावरण एमआयडीसी येथील फोक्सवॅगन शोरूममध्ये थाटात झाले.

शहराचे आमदार संग्राम जगताप, विधान परिषद सदस्य आ. अरुणकाका जगताप आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते या कारचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, श्रीरामपूरचे विभागीय पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, नगरसेवक प्रकाश भागानगरे,

फोक्सवॅगन शोरूमचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. फोक्सवॅगन तायगुन गाडीसाठी मोठ्या प्रमाणात प्री बुकिंग झालेली असून, फोक्सवॅगन अहमदनगर मध्ये 75 हून अधिक गाड्यांचे बुकिंग करून ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले.

आमदार संग्राम जगताप यांनी कोरोनाचे नियम शिथील होत असताना कार उत्पादन क्षेत्राचे मार्केट देखील भरारी घेत आहे. सर्वसामान्य कुटुंबाचे चारचाकीचे स्वप्न साकार होत असून, फोक्सवॅगनच्या कारला मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सुरक्षितता व आकर्षकतेच्या दृष्टीकोनातून कार क्षेत्रात अवतरलेली तायगुन ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी शहराचे विविध क्षेत्रातील मान्यवर, फोक्सवॅगनचे हितचिंतक आणि गाडी बुकिंग केलेले ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या फोक्सवॅगन एसयूव्ही तायगुनची किंमत सुद्धा खूप स्पर्धात्मक असून, गाडीची किंमत 10.49 लाखांपासून सुरू होत आहे.

तर या कारचा टॉप मॉडेलची किंमत 17.49 लाख एक्स शोरूम ठेवण्यात आलेली आहे. ही नवीन कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरूममध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी शोरूमला 7757000331 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe