Ahmednagar : महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, पतीने शांत डोक्याने दोन महिन्यांपूर्वीच रचला होता कट, घराशेजारी खोदला खड्डा, त्यानंतर..

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी असणाऱ्या आरोपी पतीस पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी जेरबंद केले होते. ज्ञानदेव पोपट आमटे असे आरोपीचे नाव होते.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात अतिशय धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. त्याने रचलेला कट व केलेली हत्या हे पाहून पोलिसही चक्रावले. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सदिक येथे १० नोव्हेंबर रोजी ही खुनाची घटना घडली होती.

अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने त्याने शांत डोक्याने पत्नीची हत्या केली आहे.

* अशी केली हत्या

आरोपी ज्ञानदेव याने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस तपास सुरू असताना आरोपी फरार झाल्याने पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली.

आरोपी ज्ञानदेव आमटे याचे अनैतिक संबंध असल्याने पत्नी रूपाली सोबत त्याचे वाद होत होते. याला कंटाळून त्याने पत्नीचा काटा काढायचा असे ठरवले. त्याने घराजवळ शौचालयासाठी खड्डा खोदला अन त्याचवेळी त्याच्याशेजारी दुसरा खड्डा खोदून ठेवला.

आरोपीचे १० नोव्हेंबरला पत्नीशी भांडण झाले. त्यावेळी त्याने तिचा गळा आवळून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पत्नी रूपालीचे प्रेत खड्ड्यात पुरले. त्यानंतर पोलिस ठाणे गाठून पत्नी हरविल्याची तक्रार नोंदविली.

विशेष बाब म्हणजे आरोपीने रुपालीच्या भावाबरोबर अर्थात मेहुण्याबरोबर पुणे, मुंबई येथे जाऊन तिचा शोध घेण्याचे नाटक केले. नंतर आपले बिंग फुटण्याची शक्यता त्याला वाटल्यानंतर तो फरार झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe