अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : पावसाळा सुरु झाला असून, शहरातील मुख्य बाजरपेठ असलेल्या कापड बाजार येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या नाल्यांची सफाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्तांना सदर मागणीचे निवेदन दिले. पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून वसाहतींमध्ये घरात पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात.
कापड बाजार येथील नाल्यांचे काम तत्कालीन नगराध्यक्ष स्व.नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात झाले होते. या नाल्यांची अनेक वर्षापासून सफाई करण्यात आली नसल्याने येथील नाल्यात गाळ व मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
पावसाळ्यात एम.जी.रोड, कापड बाजार भागातून वाहून येणारे पाणी व घाण शहाजी रोड, घास गल्ली भागात जमत असते. यामुळे येथील नागरिकांना या घाण पाण्याचा त्रास होतो.
बाजारातील या भूमीगत गटारीवर अतिक्रमण झाले असून, सदर अतिक्रमण काढून नाल्यांची सफाई करावी व ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोठा पाऊस येऊन सदरील भागात घाण पाणी साचल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने स्थानिक नागरिकांसह महापालिकेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा अजीम राजे यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews