अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची संख्या दिवाळी संपताच वाढू लागली आहे. बुधवारी ३२४ जणांना बाधा झाल्याने समोर आले. दरम्यान, जिल्ह्यात २६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के आहे. कोरोना बळींची संख्या ८९९ असून रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ७० झाली आहे.

दिवाळी संपल्यानंतरच्या २४ तासांत रुग्णसंख्येत ३२४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १२०७ झाली आहे. दिवाळी खरेदीसाठी नगरकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.
मागील आठवडाभर शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. यातील अनेकांनी तोंडावर मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केले. सॅनिटायझरचा वापरही अभावानेच होताना दिसला.
सोशल डिस्टन्सिंगचा तर पार बोजवारा उडला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार हे निश्चित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हा धोका लक्षात घेऊन कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करून आरोग्यसेवेतील अधिकाऱ्यांना तयारीत राहण्याचा सूचना दिल्या होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved