कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला सहा हजारांच्या जवळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरी रुग्णसंख्येत झालेली मोठी घट आणि ग्रामीणभागातही होत असलेली माघार यामुळे संगमनेर तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान गेल्या 24 तासात तालुक्याच्या रुग्णसंख्येत अठरा रुग्णांची भर पडून एकूण संख्या आता 5 हजार 994 वर पोहोचली आहे.

सप्टेंबरनंतर नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठणार्‍या कोविडच्या रुग्णसंख्येत गेल्या पंधरवड्यापासून मोठी घट झाल्याचे बघायला मिळत आहे.

या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 30 रुग्ण याप्रमाणे 451 बाधितांची भर पडली. तर नंतरच्या पंधरवड्यात त्यात सरासरी सात रुग्ण कमी होवून 23 च्या सरासरीने 344 रुग्ण वाढले.

शहरातही पहिल्या पंधरा दिवसांत तब्बल 119 तर नंतरच्या पंधरा दिवसांत 74 रुग्णांची भर पडली. दरम्यान शहर आणि ग्रामीण क्षेत्र अशा दोन्ही कडून कोविडची माघार होत असल्याचे या आकडेवारीतून लक्षात येते.

एकीकडे कोविडची माघार होत असल्याचे चित्र जरी दिसत असले तरीही दुसरीकडे तो पूर्णतः आटोक्यात आलेला नसल्याने काळजी घेणे महत्वाची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment