अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या मूग व अन्य शेतमालाची आवक मार्केटमध्ये वाढत आहे. कामाचा व्याप वाढत असतानाही याठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेतच ही कामे करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण मालाची आवक वाढल्यावर थोडा उशीर होतो. रविवारी असा उशीर झाल्यावर काही शासकीय अधिकार्यांनी तेथे येऊन व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई केली व कायद्याचे भरपूर ज्ञान दिले. शेतकर्यांच्या मालाची वेळेचे बंधन न पाळता विक्री करणार्या व्यापार्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली

असा आरोप व्यापाऱ्यांनी करत सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना शेतमालाची आवक वाढल्यावर बाजार समितीत काम करण्याची वेळ वाढवली पाहिजे, अन्यथा मार्केटचे कामकाज बंद करू असा इशारा आडते बाजार मर्चंट्स असोसिएशनने दिला आहे.
अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पत्र दिले आहे. या पात्रात त्यांनी शेतमालाचे व्यवहार करण्यास वेळेचे बंधन नसावे, काम पूर्ण करण्याची व उशिरा घरी जाण्याची परवानगी व्यापार्यांना मिळावी अन्यथा शेतकरी व व्यापार्यांचे नुकसान होऊ नये,
म्हणून बाजार समितीत व्यापारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय मर्चंट्स असोसिएशन घेईल अशी मागणी केली आहे. बाजार समितीत सध्या मुगाची आवक वाढली आहे. आलेल्या मालाची प्रतवारी करणे, तो उतरवून घेऊन संबंधित शेतकर्यांच्या नावाने नोंदवणे, त्याचा लिलाव करणे,
विक्री झाल्यावर मालाचा वजन-काटा करून वाहनात वा बैलगाडीत माल टाकणे, शेतकर्याला मालाचे पैसे देण्यासारखी कामे दुकानदार व्यापारी, खरेदीदार व्यापारी, दिवाणजी, मुनिमजी, हमाल कामगार, बैलगाडीवाले, टेम्पोवाले, ट्रकवाले करीत असतात. शेतकर्यांच्या कामात व्यस्त असलेल्या व्यापार्यांचा गौरव तर सोडाच,
पण त्यांना अपराधी व गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. दादागिरी, मारहाण व दंड आकारणी होत असल्याने त्याचा मर्चंट्स असोसिएशन निषेध करीत आहे, असे या पत्रात चोपडा यांनी म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved