विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल मी सरकारचे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मनापासून अभिनंदन करतो.

कोरोना सारख्या महामारीच जागतिक संकट राज्यावरती आलेले असताना देखील या संकटावर उत्तम प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने जनतेच्या सहभागातून जवळपास मात केली आहे. विरोधकांनी हे सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात कोसळेल अशा वल्गना केल्या.

परंतु एक वर्ष पूर्ण झालं तर देखील विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला मिळत असलेला मान-सन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील काँग्रेस पक्षाच्या असणारा महत्त्वपूर्ण सहभाग या काँग्रेस कार्यकर्त्यांना सुखावणार्‍या गोष्टी आहेत.

त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याच्यावर काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते यांच्या बरोबर उत्तम समन्वय ठेवत हे सरकार राज्यात काम करीत आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातून या कोरोना संकट काळात देखील सातबारा अद्ययावत करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून नामदार थोरात साहेब यांनी केलं.

त्याच बरोबर अतिवृष्टी झालेल्या भागाला भरघोस आर्थिक मदत राज्याच्या सरकारने केली. येणाऱ्या काळामध्ये देखील कोरोणावर पूर्णतः मात केल्या त्यानंतर महसूल उत्पन्न वाढल्यावर राज्यामध्ये विकासाचा महापूर आणण्याचे काम हे सरकार निश्चितपणे करेल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment