वेग घटला मात्र वाढ कायम; सावधानता बाळगा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात 23 डिसेंबरपर्यंत दोन हजार 626 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 540 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 18 हजार 590 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

दरम्यान गेल्या 24 तासात शहरासह तालुक्यात अवघे 3 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 88 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 7 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 1 तसेच खासगी लॅबमधील 3 असे एकूण 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

81 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe