अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक झाला असून काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ९७ व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली.
यामध्ये २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
आता ग्रामिण भागात देखील करोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज सलग सातव्या दिवशी देखील कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या.
काल आढळलेल्या १९ करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील ९७ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
९ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले. कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत १६२ जण पॉझिटिव्ह झाले. त्यातील १०७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा