पिकअपने चार वर्षाच्या बालकाला चिरडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :शुक्रवारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक – कोतूळ रस्त्यावर एका पिकअपने चार वर्षांच्या बालकाला चिरडल्याने त्या बालकाचा करुण अंत झाला. त्यानंतर पिकअपचा चालक फरार झाला.

साई सतीश शिंदे असे या मृृत बालकाचे नाव आहे. या रस्त्याने आपल्या घराकडे जात असलेल्या साईला शिंदे या बालकाला भरधाव वेगातील पिकअप (एमएच- १७ बीवाय ५६४७) चालकाने जोरदार धडक दिली.

यात बालक जागीच ठार झाला. चालक मुलाला उडवून पुढे गाडी घेऊन भरधाव वेगाने पळून जात असताना समोरच्या इतर वाहनांनाही कट मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

या अपघाताबाबत अकोले ठाण्यात चालकाविरुद्ध राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment