मढीची यात्रा सुरू; मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांनी देखील थाटली दुकाने !

Published on -

अहिल्यानगर : राज्यातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र मढी येथे सुरू होणारी यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. कैकाडी समाजाची मानाची काठी सकाळी मंदिराच्या कळसाला पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरामध्ये टेकवण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाली. यंदा प्रथमच यात्रेत दुकाने लावण्याबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे याबाबत चांगलीच चर्चा झाली.

मंदिराच्या मुख्य कळसाला फक्त कैकाडी समाजाचीच काठी लागते. अन्य सर्व काठ्या उप कळसाला टे कविल्या जातात . मंदिराचे बांधकामासाठी कैकाडी समाजाने मोलाची मदत केली व कानिफनाथांच्या पैठण येथील वास्तव्यादरम्यान त्या समाजातील भक्ताने जालिंदरनाथ व कानिफनाथांची सेवा करत गुरूकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विश्वास संपादन केला. कानिफनाथांनी आशीर्वाद देत लवकरच मी मढी येथे समाधीस्थ होईल, त्यावेळी मंदिराच्या कळसाला मानाची पहिली काठी दर्शनाला साठी आणण्याचा मान तुम्हाला बहाल करत आहे. त्यानंतरच यात्रेला सुरुवात होईल, असा आशीर्वाद दिला.

तेव्हापासून कैकाडी समाजाकडून मंदिराच्या कळसाला मानाची काठी लावण्याची परंपरा पाथर्डी येथील जाधव कुटुंबाकडून पाळली जाते. असे नारायण बाबा जाधव यांनी सांगितले. शिखर व कळस असे सर्व एकूण अंतर सुमारे 200 फुटांचे असून एवढ्या उंच चढत काठी टेकवळी हीच मोठी कसरत समजली जाते. रंगपंचमीच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून नाथांचा दंड म्हणून समजला जाणाऱ्या हजारो काठ्या मढीमध्ये मिरवल्या जातील. होळीचा दिवस हा मढीच्या ग्रामस्थांनी मानकरांसाठी राखीव ठेवला असून त्यानंतर व्यावसायिकांची दुकाने थाटली जाऊन यात्रेकरू जमायला सुरुवात होते .चतुर्थीच्या दिवशी दुपारनंतर गर्दी वाढवून रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने लाखोंची गर्दी यावेळी होते. नाथ संप्रदायाच्या परंपरा व प्रथेप्रमाणे सर्व पूजा विधि येथे होतात. त्यानंतरच काठीची मिरवणूक काढली जाते.

गुळपोळी म्हणजे मलीद्याचा मुख्य नैवेद्य तर प्रसाद म्हणून रेवड्यांचे वाटप भाविकांकडून होते. विविध मानकर यांकडून समजलेल्या माहितीनुसार मंदिराच्या बांधकामासाठी टोपले व बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी चे तराफे आमच्या समाजाने करून दिले. माती व चुना वाहतुकीसाठी हाताने तयार केलेले साहित्य पुरवले हीच मोठी सेवा आहे, असे समजून गडाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत समाज बांधव तेथेच निवासी राहिले. या वास्तव्यातूनच जात पंचायत म्हणजे समाज मेळावा रुजू झाला. कनग्या, टोपले व अन्य साहित्य विशिष्ट झाडाच्या फोकापासून म्हणजे शिंदडीच्या झाडापासून प्रामुख्याने हे सगळे हस्त कला केली जाते. पूर्वी कनग्यांमधून धान्य साठवले जात. त्यामुळे मोठी मागणी होती. आता याला सहसा ग्राहक सापडत नाही. त्यामुळे मागणीनुसारच कनग्या तयार केले जातात. कानिफनाथ म्हणजे कैकाडी समाजाचे कुलदैवत असून समाजातील प्रत्येक भाविक यात्रेच्या निमित्ताने नाथांच्या दर्शनासाठी आवर्जून येत परंपरेप्रमाणे पूजा विधी करतो. ना

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe