घरी राहूनच दिवाळीप्रमाणे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद द्विगुणीत करावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  भारतवासियांच्या अभिमानाची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी घडत आहे. या दिवशी आयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

देशावर आलेले कोरोनाचे संकट हे गंभीर स्वरुपाचे आहे. हे लक्षात घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहानानुसार दि. ५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक उत्सव न करता हा दिवस आपण दिवाळी सणासारखा व्यक्तिगत स्वरुपात घरोघरी साजरा करावा.

आपआपल्या घरावार गुढी उभारुन रोषणाई करावी. दारासमोर रांगोळी काढून आकाश कंदिल लावून या सणाचे टी.व्ही.वरील प्रक्षेपण सर्वांनी पहावे.

५ ऑगस्ट हा दिवस आनंदाचा दिवस म्हणून मोठ्या सणासारखे घरातच राहून साजरे करावे. हा ऐतिहासिक सण भव्यप्रमाणात साजरा करत असताना कोरोना साथीचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे, आणि त्यामुळे आपण सामूहिक उत्सव साजरा करणार नाही.

या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी आवर्जुन गोडाचे पदार्थ करावे आणि घरात सर्व कुटुंबासमवेत लाईव्ह प्रक्षेपण पहावे. आपण वैयक्तिक पातळीवर साजरा केलेल्या

उत्सवाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन आपल्या मित्रांसोबत आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद द्रिगुणीत करावा.

कारसेवेत सहभाग घेतलेल्या कारसेवकांविषयी अहमदनगर शहर भाजपाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे, असे आवाहन भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांनी यावेळी केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment