शहरात यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- शहरातील यल्लमा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. शहरातील तृतीय पंथीय बांधव ही यात्रा एक प्रकारचा सण असल्यासारखा साजरा करतात. यानिमित्त सजवलेल्या रथातून यल्लमा देवीची भव्य अशी मिरवणूक काढली जाते.

यल्लमा देवीला हे तृतीय पंथीय आपलं कुलदैवत मानतात यामुळे मोठ्या उत्साहात ते साज शृंगार करून मिरवणुकीत नाचतात हा सोहळा खूपच देखणा असतो.

अहमदनगरच्या कापडबाजारातून चाललेली मिरवणुक तेलीखुंट येथील लक्ष्मी माता मंदिरापाशी सांगता झाली . कोरोना मूळ या मानवजातीवर मोठं संकट आलं आहे. ते तात्काळ दूर कर अशी प्रार्थना या तृतीय पंथीयांनी यल्लमा मातेकडे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment