अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील आठवडे बाजारात हल्ली चोरीचे सत्र वाढले आहे. या बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, गर्दीचा फायदा घेवून चोरटे बाजारसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला मारत आहे.
एकीकडे चोरट्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे मात्र पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजारसाठी येणार्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. कोळपेवाडीचा बाजार ज्याठिकाणी भरतो त्या ठिकाणापासून कोळपेवाडी पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे.
दरम्यान हे चोरटे मोबाईल अथवा खिसा मारतात व मागच्या व्यक्तीकडे मुद्देमाल द्यायचा अशाप्रकारे बाजारात नागरिकांचे मोबाईल व पैशांची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला जात असल्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.
पोलिसांचे झंझट मागे नको म्हणून नागरिक तक्रार करण्याकडे काना डोळा करत असून मोबाईल चोरीमुळे बाजारासाठी येणारे नागरिक वैतागले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये