पोलिसांची हटके स्टाईल; बाहेर येतो की दरवाजा तोडू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- चोरट्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस घेऊन जाणे, फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री करत आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला जाणे अशा घटना तुम्ही सिनेमांमध्ये अनेकदा पहिल्या असतील, मात्र अशीच एक घटना नगर मध्ये घडली आहे.

आज भल्या सकाळीच शहरातील भिंगार परिसरात असणारे स्वामी रेसिडेन्सी या घरी मोठ्या संख्येने पोलीस गोळा झाले. एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला होता. मात्र याची कुणकुण लागताच आरोपीने आपल्या बंगल्याचे दरवाजे लावून घेतले व तो आत मध्ये बसला.

त्यावेळी पोलिसांनी हे दरवाजे तोडण्यासाठी तयारी केली असतात तेथे काही महिला कार्यकर्त्या आल्या व त्यांनी तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का अशी विचारणा केली. त्यामुळे पोलिसांनी नमते घेत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या दुसरीकडे आरोपीने ही घरांमध्ये बसल्याबसल्या सूत्र हरवली व कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तिकडे त्यावर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे पोलिसांची कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला स्वतःला पोलिसांच्या हवाली करण्याची विनंती केली अन्यथा खिडक्या व दरवाजे तोडण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला. अखेर फिल्मी स्टाईलमध्ये दरवाजा तोडून सदर व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment