अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते.
दरम्यान नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज कांद्याच्या भावात दोन हजाराची घसरण होवून चार ते पाच हजार क्विटंलचा सर्वसाधारण भाव निघाला.

मागील सोमवारी आवक कमी असताना एक नंबरचा कांदा दहा हजार रुपये क्विंटलने विकला होता. काही गोण्यांना बारा हजाराचा भाव मिळाला होता.
ही चांगली स्थिती असताना दोनच दिवसाने भाव दोन हजाराने व आज लगेच पुन्हा दोन हजाराने भाव घसरले आहे. दिवसेंदिवस भाव वाढत असताना नेवाशात कांद्याने आज रिव्हर्स गिअर टाकला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली आहे. तर दुसरीकडे महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved