सरपंचपदाचे आरक्षण निघाले मात्र त्या प्रवर्गातील उमेदवारच नाही!!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील सरपंचपद अनुसुचीत जातीच्या महीलेसाठी आरक्षीत झाले आहे.

मात्र येथे अनुसुचीत जातीची महीला उमेदवार नसल्याने हे आरक्षण इतरजातीचया महीलेसाठी आरक्षीत करुन मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर व ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते यांनी तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाची सोडत नुकतीच काढण्यात आली आहे. माळीबाबुळगाव गावचे सरपंचपद अनुसुचीत जातीच्या महीलेसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले. मात्र या गावात अनुसुचीत जातीची महीला निवडुन आलेली नाही. अनुसुचीत जातीचा पुरुष उमेदवार आहे मात्र पद महीलेसाठी राखीव झाले आहे.

त्यामुळे सरपंच करायचे कोणाला असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कोलते व युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन वायकर यांनी तहसिलदार शाम वाडकर यांची भेट घेवुन सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महीलेसाठी असावे तसे आरक्षण बदलुन मिळावे, अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment