नगरकरांची धावपळ वाचणार; मनपाकडून जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीसाठी केली ‘ही’ सोय

Published on -

Ahmednagar News : शहराचा उपनगर भागात मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी, तसेच विवाह नोंदणी करण्यासाठी महापालिकेत यावे लागते.

मात्र आतापर्यंत संपूर्ण शहरात एकच केंद्र असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होते परिणामी, अनेक नागरिकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. तसेच, केडगाव, बोल्हेगाव, सावेडी, तपोवन आदी उपनगरातील नागरिकांनाही दाखल्यांसाठी जुन्या महापालिकेत जावे लागते.

या नागरिकांना वेळॆत दाखले न मिळाल्यास त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असत. त्यामुळे यात नागरिकांचा वेळ व पैसा देखील वाया जात असे.

नागरिकांची होत असलेली धावपळ व खर्च टाळण्यासाठी महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदणी, तसेच विवाह नोंदणीची सुविधा आता चारही प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे.

दि. १ ऑगस्टपासूनच नागरिकांना त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयातच जन्म व मृत्यू, तसेच विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे.

जन्म व मृत्यू नोंदणी, तसेच विवाह नोंदणी सध्या जुन्या महापालिकेत केली जाते. संपूर्ण शहरात एकच केंद्र असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होते परिणामी, नागरिकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. तसेच, केडगाव, बोल्हेगाव, सावेडी, तपोवन रस्त्यावरील नागरिकांनाही दाखल्यांसाठी जुन्या महापालिकेत जावे लागते.

त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी आता महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयातच हे दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रभाग समिती कार्यालयातच कर्मचाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून दिली आहे.

आजपासून ही सेवा कार्यरत होणार आहे. यातून नागरिकांना वेळेत दाखले देता येतील, तसेच नागरिकांचाही वेळ वाचेल. त्यामुळे नागरिकांनी आता जुन्या महापालिकेत गर्दी करू नये. असे आव्हान महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe