अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यापूर्वी कोणती कामे कोणी करायची याचा आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सुरु आहे.
आगामी महिन्यापासून माध्यमिक विभागाचे नववी, दहावी आणि बारावीचे तर ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सहावी, सातवी व आठवीचे वर्ग सुरु होणार आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष तीन टप्प्यात सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालक आदींसह विविध घटकांवर जबाबदारी टाकली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने विविध उपाययोजना सुरु आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून १८ मार्चपासून प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांचे कामकाज बंद आहे. नेहमीप्रमाणेशैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु होते.
परंतु कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या बाढत आहे. अशा परिस्थितीत काही अटी व शर्ती घालून शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शाळांमध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात. त्यासाठी ग्रामपंचायत, शिक्षक, पालक व मुख्याध्यापक यांच्यावर काही जबाबदारी टाकली आहे.
त्यासंबंधिचे आदेश देखील सरकारने १५ जून रोजी जारी केले आहेत. त्यानुसार शाळा कधी सुरु व्हाव्यात, याचे वेळापत्रक देखील जाहीर केले.
हे वेळापत्रक संभाव्य असून, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, असे निर्देश सरकारने जिल्हा परिषद, महापालिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews