‘त्या’ गुटखा प्रकरणाची व्याप्ती संगमनेरमध्ये ; आणखी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले.

आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, आता त्याचे कनेक्शन संगमनेर तालुक्यापर्यंत जाऊन पोहोचले असून काल पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी

येथूल एका पोल्ट्री फार्ममध्ये लपवलेल्या गुटख्यासह 20 लाखांचा मुद्देमाल श्रीरामपूर शहर पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांनी दिली. याप्रकरणातील काही आरोपी पसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

यातील काही आरोपी हे गुजरातला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून यातील अगोदर अटक करण्यात आलेला विजय चोपडा व काल निमगावजाळी येथील संतोष डेंगळे हे दोघे असल्याचे पुढे येत आहे.

दरम्यान, या आरोपींकडून चौकशी केली असता या प्रकरणाचे कनेक्शन संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी या गावापर्यंत जाऊन पोहोचले असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी स्वतः आपल्या पोलीस पथकास बरोबर घेऊन निमगाव जाळी याठिकाणी अचाक छापा टाकण्यासाठी सापळा रचला.

रात्रीच्या दरम्यान एका हॉटेलच्या मागे संतोष नामदेव डेंगळे यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये झाडाझडती घेतली असता त्याठिकाणी पोलिसांना गुटखा आढळून आला. यावेळी पोलिसांनी 4 लाखांच्या गुटख्यासह गुटखा वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने किंमत अंदाजे 15 ते 16 लाख असा सगळा 20 लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

दरम्यान, आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, मात्र या जागेच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एक आठवडा उलटूनही लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment