त्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध अद्यापही सुरूच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेरच्या मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंढा डोहात वाहून गेलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान गणेशचे वडील, भाऊ, मामा हे सकाळपासून डोहोलगत बसून आहे.

गणेश यांचा शोध लागत नसल्याने वातावरण संवेदनशील झाले आहे. तहसिलदार ज्योती देवरे या देखील घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गणेश यांच्या शोधासाठी अहमदनगर अग्निशमन दलाचे जवान सकाळपासून कार्यरत आहेत.

परंतु पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत आहे. तसेच पोहता येत नसल्याने या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या खोल जागेत अडकण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती.

यामुळे तहसिलदार देवरे यांनी पुणे येथील एनडीआरएफ पथकाला शोध कार्यासाठी पाचारण केले आहे. एनडीआरएफच्या जवानांच्या माध्यमातून हे शोधकार्य सुरू आहे.

अजूनही काहीच तपास लागलेला नाही. रेल्वे पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे हे गुरुवारी आपल्या मित्रांसमवेत मांडओहोळ धरणालगत फिरण्यासाठी गेले होते.

त्यावेळी रुईचोंढा डोहालगत असलेल्या धबधब्यावर गेले होते. तिथे त्यांचा पाय घसरल्याने ते डोहात पडले. डोहाखाली मांडओहोळ धरण आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment