शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबत नाही; आता खतांच्या किंमती…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- शेतकऱ्यांवर वर्षभर संकटांची मालिका चालूच आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन करावे तर बाजारात (Chemical fertilizer) रासायनिक खतांचे दर ( price rise) गगणाला भिडलेले आहेत.

त्यामुळे (Farmer) शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केलेला खर्च पुन्हा पाठीमागे येईल कि नाही याची शाश्वती राहिलेली नाही. रासायनिक खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने रासायनिक खतांच्या किमती मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसात दोनशे ते सातशे रुपये पर्यंत वाढ झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक औषधांच्या किमती वाढल्या आहेत. मागील 15 दिवसांमधील रासायनिक खताच्या दरातील तफावत

– सुफला 15 15 15 मागिल महिन्यात 1350 या महिन्यात 1400

– महाधन 10 26 26 मागिल महिन्यात 1470 या महिन्यात 1640

– महाधन 12 32 16 मागिल महिन्यात 1480 या महिन्यात 1640

– महाधन 24 24 0 मागिल महिन्यात 1700 या महिन्यात 1900

– आयपीएल 16 16 16 मागिल महिन्यात 1370 या महिन्यात 1475

– पोटॅश मागिल महिन्यात 100 या महिन्यात 1780 पिके जगवायची तरी कशी ?

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी.अश्या नानाविध कारणामुळे उत्पादनात घट होते पर्यायाने शेतकरी तोट्यात जातो. शेती परवडेनाशी होती.

यावर्षी एका बाजूला नैसर्गिक आपत्ती आणि दुसऱ्या बाजूला शेती साठे लागणारे खाते, बियाणे यांच्या भावात झालेली भरमसाठ वाढ यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ नैसर्गिक आस्मानी संकटे आल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला उत्पन्न कमी मिळत आहे.

कोरोना असल्या कारणाने खते निर्मिती प्रक्रिया महागली आहे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतावर झालेला आहे. गेल्या पंधरा वीस दिवसात रासायनिक खतांच्या किमतीत जी 200 रुपयांपासून ते 700 रुपयां पर्यत वाढ झाली. खतांच्या किंमती कमी होण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe