पुढच्या दोन महिन्यात परिस्थिती अजून गंभीर होणार – आ. कानडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  पावसाळा सुरु असल्याने डेंग्यु, मलेरियाची साथ या काळात येत असते. सध्या करोनाचा कहर सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे संभाव्य धोके भोके लक्षात घ्या. प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.

कारण यापेक्षाही गंभीर परिस्थिती येत्या दोन महिन्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील तहसील कचेरीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्याप्रसंगी कानडे बोलत होते.

आ. कानडे म्हणाले, मला राजकारण करायचे नाही. परंतु सध्याची परिस्थिती गंभीर आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यु, प्लेगची साथ येत असते. आधीच आपल्याकडे करोनाने कहर केलेला आहे.त्यात जर पावसाळा पावसाळा असल्याने डेंग्यू, मलेरियाची साथ आली तर आणखी मोठे संकट येऊ शकते.

त्यामुळे प्रत्येकाने आपले काम व काळजीपुर्वक आणि चोखपणे गरजेचे आहे. आशा सेविका तसेच आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या काळात प्रत्येक व्यक्तीची तपासणी कशी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नगरसेवकांनीही घरात न बसता वार्डात फिरुन लोकांना मदत केली पाहिजे.

जर आतापासून या रोगाच्या बाबतीत सर्वांनी काळजी घेतली नाही तर दोन महिऱ्याने आणखी गंभीर परिस्थिती उद्‌भबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी आताच काही गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे.

शहरात स्वच्छता कशी राहील, डासांच्या निर्मूलनासाठी फवारणी मारण्यासंदर्भातही तातडाने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आ.कानडे म्हणाले. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील म्हणाले शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आता सर्वाचे डेस्टींग करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी आरोग्य पथके तयार करुन ते घरोघरी जाणार आहेत. एक पथक दररोज पन्नास घरांना भेट देणार आहे. या पथकात एक आरोग्य कर्मचारीव दोन स्थानिक स्थानिक ३ लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असणार आहेत. ताप, खोकला, दम लागणे, अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फेवर क्लिनिकमध्ये उपचार दिले जाणार आहेत.

प्रत्येक पाच ते दहा पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जि.प, सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच नगरसेवक दिपक चव्हाण,

बाळासाहेब तोरणे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, सचिन गुजर, दिलीप नागरे, डॉ. मोहन शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी तसेच कार्यकतें उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment