ऊसतोड मजुराचा मुलगा ट्रॅक्टर मधून पडला आणि पहा पुढे काय घडले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  सध्या सर्वत्र ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासोबत रस्त्यांनी जात असलेले आपण अनेक ठिकाणी पहिले असतील. मात्र वडिलांसोबत ट्रॅक्टर मधून जात असलेला मुलगा ट्रॅक्टर मधून पडला व व्हाट्सअँपच्या माध्यमातून तो पुन्हा सापडला असल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण वय ८ झोपेत असताना माळेगाव ता. बारामती कारखान्यावर जात असताना मढेवडगाव शिवारात ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला. तो रस्त्यावर पडला कोणाला माहीतच झाले नाही.

रात्रीच्या अंधारात घाबरलेला किरण आसरा घेण्यासाठी सखाराम गायकवाड यांच्या घराचा दरवाजा वाजविले. रात्रीच्या सुमारास दरवाजा वाजविल्याने गायकवाड कुटुंब चोर समजून घाबरून गेले. त्यांनी मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या फरकांडे कुटुंबाला फोन करून चोर आल्याची माहिती दिली.

फरकांडे कुटुंबातील सात आठ जण गायकवाड कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले. मात्र वस्तूस्थितीत जखमी अवस्थेत एक लहान मुलगा दाराजवळ दिसला. सर्वांनी त्याला विचारपूस केली. सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. जखमी मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. त्याच्यावरती उपचार केले आणि भीमराव फरकांडे यांनी आपल्या घरी नेऊन आसरा दिला.

शुक्रवारी सकाळी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. दरम्यान ट्रॅक्टरमधून आपला मुलगा बऱ्याच अंतरावर गेल्यावर त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. ट्रॅक्टर चालक पुन्हा नगरच्या दिशेने आपला ट्रॅक्टर वळविला मात्र शोध लागला नाही.

तो ट्रॅक्टर नगरवरून बारामतीच्या दिशेने येत असताना मढेवडगाव येथे एका दुकानावरती थांबला. उस तोड मजुरांचा ट्रॅक्टर पाहून दुकानदाराने कोणाचा मुलगा हरविला आहे का अशी चौकशी केली असता तो मुलगा त्यांच्याच ट्रॅक्टरमधून पडला हे मढेवडगाव ग्रामस्थांच्या लक्षात आले. किरणला त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment