मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलीनेच दिला पित्याला अग्नी…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील प्रसिद्ध डॉ.बबनराव राजाराम चिंधे (वय 65 वर्षे) यांचे रविवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.

आजारी असलेला मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलगी डॉ.आश्विनी हिनेच पित्याला अग्नी दिला. मूळचे माळी चिंचोरा येथील रहिवासी असलेले डॉ.चिंधे हे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्त 30 ते 35 वर्षांपूर्वी भेंडा येथे आले आणि भेंडा येथेच कायमचे स्थायिक झाले होते.

त्यांना काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा त्रास झाला होता.नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन दोन दिवसापूर्वीच ते भेंडा घरी परतले होते.मात्र रविवारी सकाळी त्यांना पून्हा ह्रदय विकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नेवासा फाट्यावर उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

निवडक उपस्थितांच्या हजेरीत भेंडा येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांची पत्नी व मुलगा ही आजारी असून सध्या उपचार घेत असल्याने ते अंत्यविधीसाठी उपस्थिती राहू शकले नाही.

त्यामुळे मुगली डॉ.आश्विनी हिनेच मामाच्या मदतीने अंत्यसंस्कार केला.तिनेच पित्याला पाणी पाजले व अग्नी दिला. डॉ.चिंधे यांचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment