Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जुन्या घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्णय खून करणाऱ्या युवकाने नऊ महिन्यापूर्वी स्वतःच्या आईचाही खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका खुनाच्या तपासामुळे दुसऱ्या खून प्रकरणालाही नऊ महिन्यानंतर वाचा फुटली आहे.
चंदनापुरी घाटातील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या खून प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

या मुलीचा कसा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. या तपासा दरम्यान तुषार वाळूज याने आपल्या आईचाही खून केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली.
तुषार याने वर्षभरात दोन खून केल्याचे निष्पन्न झाले. तुषार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पैसे द्यावे, यासाठी तो आईला त्रास द्यायचा त्याच्या आईने त्याला पैसे न दिल्याने पैशासाठी त्याने आपली आई सखुबाई हिचा जानेवारी मध्ये खून केला.
मात्र त्यावेळी ही आत्महत्या असल्याचे दाखविण्यात आले होते. या खून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून याबाबत गुन्हा लवकर दाखल करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
खून प्रकरणातील साक्षीदार पोलिसांच्या तावडीतून पळाला. अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर खून प्रकरणातील आरोपीने दुसऱ्या दिवशी पुन्हा चंदनापुरी घाटात जाऊन सदर मुलगी मयत झाल्याची खातरजमा करून घेतली.
यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक जोडीदारही होता. पोलिसांनी या जोडीदाराला साक्षीदार म्हणून ताब्यात घेतले. मात्र या साक्षीदाराने पोलिसांच्या तावडीतून पलायन केल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.