अहमदनगर(प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीत अस्वच्छतेने नागरिक त्रस्त असून, सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तातडीने या परिसरात स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मनपाचे उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, विनोद गायकवाड, राजू पवार, बाळू कसबे, सुरेखा पवार, हनिफ शेख, संदीप गायकवाड, आशा पठारे, मंदा कांबळे, रेखा घाडगे, मनीषा नाईव आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीत 164 कुटुंब राहतात. या भागात ड्रेनेजलाईन नसल्याने सेप्टिक टँकचा वापर केला जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून सेप्टिक टँक ओपन असल्यामुळे त्या सेप्टीक टँकमध्ये कुत्रे व मांजरे पडून मोठी दुर्गंधी पसरली आहे.
या दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दलित वस्ती मधील रस्त्याचे काम मंजूर असून, फक्त खडी व डांबर टाकून सदर काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे.
यामुळे या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. सदर प्रश्न मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच मारुती मंदिराजवळ एका कन्स्ट्रक्शनचे काम चालू असल्याने रस्त्याची अवस्था अजून वाईट झाली आहे.
तर नागरिकांना दमबाजी करुन सदर कन्स्ट्रक्शनचे कामगार बेकायदेशीर रस्त्याचा वापर करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर तातडीने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आयुक्तांच्या दालनात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीत अस्वच्छतेने नागरिक त्रस्त असून, सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने या परिसरात स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मनपाचे उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, विनोद गायकवाड, राजू पवार, बाळू कसबे, सुरेखा पवार, हनिफ शेख, संदीप गायकवाड, आशा पठारे, मंदा कांबळे, रेखा घाडगे, मनीषा नाईव आदी.