अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. मंगळवार (दि१५ डिसेंबर) रोजी सर्कलच्या सुमारास हा अपघात घडला होता.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन कोसळला. या अपघातातून चालक गजानन चव्हाण (रा. पुसद, जि. नांदेड) हा सुदैवाने सुखरूप बचावला आहे.
ट्रॅक्टर काळेवाडी देवगाव येथून अंबालिका कारखान्याकडे उसाच्या दोन ट्रॉली घेऊन चाललेला होता. उताराला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन कोसळला. दरम्यान सुदैवाने या अपघातात चालक बालबाल बचावला आहे, मात्र ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com