बलात्कारात ‘त्या’ संशयितास ‘असे’ घेतले ताब्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जुलै २०१८ मध्ये नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला

मोहसीन बादशहा सय्यद (रा. माळी चिंचोरे, ता. नेवासे) हा संशयित आरोपी दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या राहत्या घरातच मुसक्या आवळण्यात

नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी व त्यांच्या पोलिस पथकाला यश आले आहे. दरम्यान नेवासे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून प्रभारी पोलिस अधिकारी अभिनव

त्यागी यांनी आपल्या पोलिस पथकासह संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. दरम्यान आरोपीला नेवासे पोलिसांत हजर करून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले.

दरंयान, नेवासे पोलिसांनी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या पथकाने नेवासे परिसरातील संभाजीनगरात सोमवारी (ता. २) सायंकाळी मटका अड्ड्यावर छापा टाकून अंकुश परसराम धनवटे याला रोख रकमेसह ताब्यात घेऊन धनवटेसह मटका चालक लक्ष्मण किसन भवार (रा. प्रवरासंगम, ता. नेवासे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News