अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-नगर शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. नुकतेच शहरातील नवनागापूर मधील आंधळे चौरे नगरमधील अशोक कुमार सिंग यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने घरातील दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत अशोक कुमार हरप्रसाद सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नवनागापूर येथील आंधळे चौरे नगर अरूण हॉटेलच्या पाठीमागे गणपती मंदिराजवळ राहणारे
अशोक कुमार हरप्रसाद सिंग यांच्या राहत्या घराच्या मेन गेटचे व मुख्य दरवाजाचे कडी व कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडले व घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करून
सोन्याचांदीचे दागिने,डायमंडचे घड्याळ व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अशोक कुमार हरप्रसाद सिंग यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोसई पाठक हे करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved