अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :मागील अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे कोरोनाचा संसर्ग थांबलेला होता. परंतु आता याठिकाणी तिघे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
लोणीतील भारतीय स्टेट बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेली महिला करोना बाधित आढळून आली. त्यांचे पती अहमदनगर येथे एका सरकारी बँकेत नोकरीला आहेत.
त्यांना त्रास होऊ लागल्याने ते लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथून त्यांना प्रवरेच्या कोव्हिड सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवले असता त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्यामुळेच पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याच अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील दोन मुले, एक महिला, शेजारची एक व्यक्ती आणि बँकेतील सोळा कर्मचार्यांना प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
प्रवरा रुग्णालयातील एका परिचारिकेचा मुलगा बुधवारी पुण्याहून लोणीत आला. या तरुणाची चाचणी घेण्यात आल्यावर तो पॉझिटिव्ह आढळून आला.
त्याच्या कुटुंबातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आले. हे तिन्ही रुग्ण पद्मश्रीनगर व स्वामी समर्थ केंद्रामागील वसाहतीत राहणारे असल्याने प्रशासनाने पद्मश्री नगर,
शेलकर वस्ती परिसर, स्वामी समर्थ केंद्र रस्ता हा भाग राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews