चोरट्याने बँकेसमोरून दुचाकी लांबवली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे . बँकेत आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या एकाची बँकेसमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली.

ही घटना स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेसमोर घडली. याप्रकरणी तौफिक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोठला येथील रहिवासी तौफिक सादिक सय्यद हे त्यांचे आधार लिंक करण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत गेले होते.

यावेळी त्यांनी त्यांची होंडा कंपनीची दुचाकी (एमएच १६ सीबी ८२३९) समोर पार्कींगमध्ये उभी करून मित्रासोबत बँकेत गेले. दरम्यान ते ज्यावेळी काम आटोपून बाहेर आले यावेळी त्यांची मोटारसायकल आढळून आली.

त्यामुळे त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोहवा.गोर्डे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News