अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-मोबाईलवर बोलत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेणारा चोरटा अखेर पोलिसांनी जेरबंद केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील इंद्रप्रस्थ मंगलकार्यालयाजवळ फोनवर बोलत असताना त्याचे पाठीमागून दोन इसम स्कुटी मोटारसायकलवर येऊन हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले,
अशी फिर्याद आर्दश श्याम शिरोळे यांनी बुधवारी (दि.१८) दिली होती. या फिर्यादीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता.
या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक श्रीरामपूर येथे जावून सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.
सदर पकडलेल्या आरोपी सलमान सलीम ईराणी (वय २१ रा.वॉर्ड नं .१ ईराणीवस्ती श्रीरापमुर) यास ताब्यात घेतले. त्याला घडलेल्या गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्हयात चोरी गेलेला रेडमी कंपनीचा १५ हजार रु किंमतीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली २५,००० रु किंमतीची दुचाकी असा एकूण ४० हजार रु.मुद्देमाल आरोपी याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved