मेडिकलचा दरवाजा तोडून चोरटयांनी रोकड लांबवली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील सावकर चौकातील रसराज मेडिकल स्टोअर्सवर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरट्यानी मेडिकल मधील ४२ हजार रुपये रोख व एक मोबाईल असा ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी शैलेश केशवराव साबळे (वय-३९) यांच्या मालकीचे रसराज मेडिकल स्टोअर्स नावाचे औषधी विकण्याचे दुकान आहे.

त्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले व ते आपल्या सुखशांतीनगर येथील घरी निघून गेले. दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानच लाकडी दरवाजा तोडून दुकानातील ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

शिवाय तेथे असलेला एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा मोबाईल लंपास केला आहे. असा एकुण चोरट्यानी ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने मेडिकल स्टोअर्सचे मालक शैलेश साबळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment