अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-कोल्हार भगवतीपूर येथे मंगळवारी रात्री कोल्हार भगवतीपूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
मनिमंगळसूत्र, टॉप्स, सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. जया राजेंद्र गरगडे यांच्या घरी चोरी झाली.
सोबत बस स्टँडजवळ गोरक्ष निवृत्ती साळुंखे, गोविंद शर्मा, दीपक नानासाहेब ओहोळ यांचेसुद्धा घर आणि दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला; मात्र केवळ गोरक्ष साळुंखे यांचे दुकानातून साडेतीन हजार रुपये चोरट्यांचा हाती लागले.
चोरट्यांनी गरगडे यांच्या किचनच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला; परंतु जया गरगडे यांना याची चाहूल लागताच त्यांनी इतरांना जागे करण्याचा प्रयत्न केला.
मात्र चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून धरत कैची दाखवल्याने त्यांनी प्रतिकार केला नाही. दरम्यान चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला.
सकाळी घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved