चोरटयांनी दागिन्यांसह शेळ्या चोरून नेल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगोरी येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कम, दागिने व शेळ्या चोरून नेल्या.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटयांशी झालेल्या झटापटीत आबासाहेब खंडागळे हे जखमी झाले असून, त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी पाठविले आहे.

रविवारी पहाटे शेवगावच्या पूर्व भागातील शिंगोरी (ता. शेवगाव) येथे ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेल्या सुखदेव खंडागळे व नारायण पोपळघट यांच्या घरात घुसून चोरटयांनी घरातील सामानाची उचकापाचक केली.

आबासाहेब खंडागळे यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. आरडा ओरड झाल्यानंतर चोरट्यांनी गावालगत असलेल्या दराडे वस्तीकडे आपला मोर्चा वळवला.

दराडे वस्तीवरून चोरट्यांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. चोरीची माहिती पोलिसांना मिळताच,शेवगाव चे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोना. अण्णा पवार, संपत एकशिंगे, लबडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News