अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाईचा धडाका सुरु आहे.
अशीच एक कारवाई नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत नदीपात्र शेजारी बहुचर्चित भुरका चौक पानगाव येथील मटका अड्ड्यावर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला आहे.
या ठिकाणी छापा टाकून पोलीस हवालदार संदीप घोडके यांच्या पथकाने तिघांवर कारवाई केली. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान तीनही ठिकाणांची छाप्यात मटका घेणाऱ्यांवर कारवाई झालेली असली तरी हे तिघेही ज्या बुकीसाठी मटका घेतात त्या गब्बर मटका बुकिंग मात्र सही सलामत राहिले आहेत.
याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजच्या या छापा सत्रात पोलिसांनी गणेश लहु सोनवणे (रा. लांडेवाडी ता. नेवासा), बाबासाहेब भोसले (रा. राजवाडा, सोनई) व वसंत दामू जंगले (रा.पानेगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved