अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गर्दीमुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राहाता शहरातील व्यपा-यांनी स्वयंस्फुर्तिने प्रत्येक गुरुवारी जनता कर्फ्यु व इतर दिवशी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राहाता शहरातील व्यावसायांमध्ये दुकाने दररोज किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता.
तो दूर व्हावा यासाठी नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांच्या दालनात व्यापा-यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले की राज्यात सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले. परंतु नागरिक विनाकारण व्यापार पेठ व इतर ठिकाणी गर्दी करतात. यामुळे गर्दीमुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम