अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- शहरात कोरोनाचे झपाट्याने वाढत असलेले संक्रमण रोखण्यासाठी जिल्हातंर्गत असलेल्या प्रवास बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष विकी प्रभळकर यांनी दिली आहे.
अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मध्यंतरी लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिली गेल्याने शहरात बाहेरगावाहून येणार्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
परिणामी अहमदनगर शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांच्या संपर्काची साखळी तुटणे आवश्यक आहे. जिल्हा बाहेरुन नागरिक सहजपणे शहरात प्रवेश करीत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात येणार्या-जाणार्या नागरिकांची वाहतुक थांबविण्यासाठी जिल्हातंर्गत प्रवास बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलतेमुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. इतर जिल्ह्यातून येणारे नागरिक कोणतीही परवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्यात येत आहे.
जिल्ह्याच्या सिमेवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस येणार्या- जाणार्या नागरिकांची कोणतीही तपासणी करीत नसल्याचा आरोप करीत.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हातंर्गत प्रवास बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा