अहमदनगर :- पुण्याहून नगरकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास चौघांनी अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाइल व सोनसाखळी असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
१८ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. योगानंद स्वामीराव हत्तरके (राहणार मल्लिकार्जुन नगर, हत्तुरे वस्ती सोलापूर, हल्ली मुक्काम बडेचाळ, आकाशनगर, पुणे) हे नगरकडे येत असताना चास शिवारात इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ अरुण घुगे, कृष्णा व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लंपास केला.

- Ahilyanagar Collector पदी Dr. Pankaj Ashiya यांची नियुक्ती
- नगर पुणे रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट ! खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं…
- Mutual Fund SIP मुळे कोट्यधीश! फक्त 10,000 गुंतवून झाली तब्बल 1,68,00,00,000 ची कमाई ! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा बदल ! ‘मिसिंग लिंक’ कधी होणार सुरू ? प्रवास वेळ ३० मिनिटांनी कमी !
- पुणे PMPML चा ऐतिहासिक निर्णय ! महिलांसाठी मोफत बस सेवा…पुण्यात कोणते मार्ग फ्री असणार? चेक करा