अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-प्रवरा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ दुचाकीवरील दोघा तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
यात त्यांच्या हाता पायाला जखमा झाल्या आहेत. कुऱ्हे वस्तीवरून सागर जाधव (रा. जवाहरवाडी, एकलहरे शिवार) व त्यांचा मित्र हे घरी चालले होते. दुचाकीवरून जात असताना तळ्याजवळ बिबट्याने हल्ला केला.
या हल्ल्यातून दोघेही थोडक्यात बचावले. दोघांनाही नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले असून दोघांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांच्याही हातपायाला जखमा झाल्याचे सांगण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved