हौदात बुडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एका चार वर्षीय मुलाचा हौदामध्ये बुडुन दुर्देवी असा मृत्यु झाला आहे. शंभो सोनवणे (रा. यवत, तालुका दौंड,जि.पुणे) असे मयत चिमुरड्याचे नाव आहे.

दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शंभो हा त्याचे मामा श्रीकांत सोनवणे (रा.वडझिरे,ता.पारनेर) याचे घरी आई शुभांगीसोबत आला होता. मामाच्या नविन घराचे काम चालु होते.

घराच्या हौदामधे शंभोचा याचा खेळता खेळता तोल गेल्यामुळे पाण्यात पडला आणि त्याचा बुडुन त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

मामा संदीप सोनवणे यांनी त्याला हौदामधुन बाहेर काढले आणि गावातील श्री हाॅस्पीटलमधे डाॅ.श्रीमंदीलकर यांच्याकडे त्याला नेले.

मात्र डाॅक्टरकडे जाण्यापूर्वीच शंभोचा मृत्यु झाल्याचे समजते. तरीसुध्दा पारनेरमधील डाॅ.पठारे यांच्या हाॅस्पीटलमधे त्याला हलविण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.